National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

जागतिक महिलादिनानिमित्त गोपाळवाडी शाळेत कर्तृत्ववान ‘पाहुणे आले भेटीला ….!!’

School 523

जागतिक महिलादिनानिमित्त गोपाळवाडी शाळेत कर्तृत्ववान ‘पाहुणे आले भेटीला ….!!’

  “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।” या संस्कृती श्लोकात सांगितल्या प्रमाणे ,जिथे नारीचा सन्मान होतो ,तिथे साक्षात देवतांचा सुद्धा वास असतो. भारत हा प्राचीन काळापासून स्त्रियांना मान देणारा ,आदर देणारा असा देश आहे …!! असाच स्त्रियांच्या गौरवाचा दिन , महिला दिन…..!!

            रविवार ८ मार्च २०२० अर्थात जागतिक महिला दिन , विसाव्या शतकापर्यंत जगात महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते ,याविरुद्ध जगभरातील महिलांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागला , रशियात ८ मार्च १९१७ ला पेट्रोगार्ड या शहरात महिलांनी न्याय हक्क ,शांतता आणि अन्नासाठी विराट मोर्चा काढला आणि तेव्हापासून ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .

              आई , आज्जी ,पत्नी ,मैत्रीण ,प्रेयसी ,बहीण ,आत्या ,मावशी अशी विविध रूपे धारण करणारी आणि प्रेम ,माया ,ममता ,वात्सल्य ,जिव्हाळा , त्याग , नम्रता ,बुद्धिमत्ता ,धैर्य ,शौर्य ,विरता यांचा संगम जीच्यापाशी झाली आहे अशी नारी ,स्त्री ,महिला….!!  त्यातून ८ मार्च त्यानिमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘कर्तृत्ववान पाहुणे आले भेटीला …..!!’ ह्या कार्यक्रमांतर्गत काही कर्तृत्ववान महिला चिमुकल्यांच्या भेटीला आल्या. कु स्नेहल कुऱ्हे हिने राजमाता जिजाऊंचे (  https://youtu.be/mVKlqBuv06Y )अतिशय करारी असे तर पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी ( https://youtu.be/oZRIek63OIs )यांचे अतिशय बहारदार असे सादरीकरण केले. यानंतर शाळेची स्टार बाल कलाकार कु प्रियंका हापसे ( https://youtu.be/uyeBcgenr34 )हिने आपल्या अफलातून शैलीत आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची भेट घडवली. या तीन महनीय कर्तृत्ववान महिलांच्या भेटीने प्रेरित झालेल्या चिमुकल्यांना कु स्वरांजली रमेश जाधव हिने गानसम्राज्ञी लता मंगेशकरची भेट घडवत सुरेल गीत ऐकवले…..!!

             शाळेची उपमुख्यमंत्री कु मंजू दत्तात्रय हापसे हिने संवादकाची भूमिका बजावत ‘लेक वाचवा ,लेक शिकवा’ हा संदेश देणारा मुकुट डोक्यावर घातला होता.”आपण दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना योग्य मान दिला पाहिजे ,त्यांचा सन्मान केला पाहिजे ,हाच खरा महिला दिन” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.

                “आपण आपल्या घरी असतांना आपली आई ,बहीण ,आज्जी ,आत्या ,मावशी अशा सगळ्यांना त्यांच्या कामात मदत केली पाहिजे. स्त्री पुरुष हे समान आहे ही समानता आपण सर्वठिकानी पाळली पाहिजे.” असे नारायण मंगलारम म्हणाले.

                 यावेळी अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुऱ्हे ,रुक्मिणी जाधव ,संगीत जाधव आदी सह मोठ्यासंख्येने माता पालक उपस्थित होते.

ता क : कार्यक्रमातील सादरीकरणाचे व्हिडीओ नक्की पहा त्यासाठी स्पर्श करा खालील किंवा वरील लिंकला ….!!

राजमाता जिजाऊ

https://youtu.be/mVKlqBuv06Y

आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले

https://youtu.be/uyeBcgenr34

पहिल्या महिला डॉ आनंदीबाई जोशी

https://youtu.be/oZRIek63OIs

                     शब्दांकन  
             नारायण मंगलारम
         जि प प्रा शा गोपाळवाडी
         ता राहुरी ,जि अहमदनगर

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes