ग्रेट भेट – पुष्प दुसरे – बी एस एफ जवानाची मुलाखत
ग्रेट भेट – पुष्प दुसरे – बी एस एफ जवानाची मुलाखत
“ए मेरे वतन के लोगो ,
जरा अंखो में भरलो पाणी
जो शहीद हुवे है उनकी
जर याद करो कुर्बानी …!”
लतादिदींचे भारतीय सैन्याच्या असीम त्याग आणि धैर्याचे वर्णन करणारे हे गीत ऐकून भारताचे तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याही डोळ्यात अश्रू तराळले होते …..!!त्यातील एक एक शब्द ऐकायला लागलात की अंगावर शहारे येतात ….!!
राजस्थानच्या वाळवंटातील शरीर भाजून काढणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून तर काश्मीरच्या हाडं गोठवणार्या कडाक्याच्या थंड बर्फाळ प्रदेशात आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस दक्ष असतात ते म्हणजे आपल्या ‘भारतीय सीमा सुरक्षा दलाचे ( बी एस एफ )’ जवान …
!! असे हे जवान आपल्या गावचे ,आपल्या तालुक्याचेच नव्हे तर आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत ….!!
असेच एक भूषण म्हणजे आपल्या गोपाळवाडी चेडगावचे भूमीपुत्र आमच्या गोपाळवाडी शाळेचे पालक बी एस एफ जवान मेजर श्री दिपक गायकवाड हे होत …..!!अशा देशभक्त व्यक्तीचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा करण्यासाठी आज आम्ही आमच्या शाळेत ग्रेट भेट उपक्रमा अंतर्गत मेजर श्री दिपक गायकवाड यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते ,विशेष म्हणजे ही मुलाखत आमच्या शाळेची बाल स्टार कलाकार कु प्राजक्ता पोपट हापसे हिने तिच्या तितक्याच बहारदार शैलीत घेतली …..!!
एका जवानाचे खडतर जीवन ,सैन्यात भरती होण्यामागची प्रेरणा ,त्यासाठी घेतलेले परिश्रम ,आणीबाणी ,अटीतटीची प्रसंग, विद्यार्थ्यांना दिलेला खूप शिकण्याचा आणि देशसेवा करण्याचा संदेश तर इतरांना जे काम असेल ते प्रामाणिक पणे करून देशसेवा करण्याचा संदेश सगळं काही प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांना भरभरन देणारं असं होतं….!
या ग्रेट भेट उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुरेश जाधव हे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री दादासाहेब जाधव हे उपस्थित होते ,आभार मुख्याध्यापक श्री सर्जेराव जाधव यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री नारायण मंगलारम यांनी केले.
यावेळी अंगणवाडी सेविका श्रीम हिराबाई जाधव आणि मदतनीस श्रीम छाया कुर्हे या ही उपस्थित होत्या .सर्व उपस्थिठांच्या हस्ते श्री दिपक गायकवाड यांच्या शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या .
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर