राष्ट्रीय हिंदी दिवस व मतदार जनजागृती…!
राष्ट्रीय हिंदी दिवस व मतदार जनजागृती…!
“हिंदी भाषा नही भावो की अभिव्यक्ती है ,
यह मातृभूमीपर मरमिटने की भक्ती है ….!
असच मातृभूमीवरचे प्रेम अभिव्यक्त करणारा आपल्या राष्ट्रीय भाषेचा ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ आणि त्याच बरोबर येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकिसाठी जनजागृती अभियान अंतर्गत आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत ‘प्रभात फेरी’ , मतदार आणि हिंदी वापरा विषयीच्या जनजागृती साठी घोषणा देण्यात आल्या …!!
चीनची मॅडेरियन ,स्पॅनिश ,इंग्रजी आणि अरबी भाषे नंतर जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे आणि आपल्या भारतात 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करतो.
“कुठल्याही देशाला गुलाम बनवायचे असेल तर सर्वात आधी त्यांची भाषा नष्ट करा तो देश गुलाम होईल ,असे म्हंटले जाते ,इतके महत्व भाषेला आहे.” असे शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत म्हणाले.
“आपल्या भारताची रचना ही भाषावादी प्रांत रचना आहे ,असे असले तरी हिंदी ही आपल्या संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी आणि व्यवहारात वापरली जाणारी भाषा आहे ,तेव्हा आपणही तिचा खुल्या मनाने स्वीकार केला पाहिजे आणि जिथे आपली मातृभाषा शक्य नाही अशा ठिकाणी आवर्जून हिंदी वापरली पाहिजे.” असे शाळेचे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम सर हे म्हणाले.
शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर पुढे म्हणाले ,” भाषा ही व्यक्तीच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे ,हा स्वाभिमान आपण सर्वांनी जपला पाहिजे , हिंदी भाषा अनेकतेत एकता प्रस्थापित करण्याची सूत्रधार आहे.राष्ट्रीय स्तरावर हिंदीच्या वापरला प्राधान्य दिले पाहिजे.मराठी नंतर प्राधान्याने हिंदीचा वापर केला पाहिजे.”
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘हिंद देश के निवासी …….’ हे राष्ट्रीय भाषेतील गीत सादर केले ,तर
‘हिंदी हमारी है महान ,
हमे इसका है अभिमान’
अशा घोषणांनी वातावरण हिंदीमय करून टाकले. नंतर हिंदी भाषा वापराची आणि मतदार जनजागृतीची शपथ घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर