कोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….!!
कोरोना से डरोना …..!!
अर्थात
कोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….!!
गुरुवार दिनांक 12 मार्च 2020
कोरोना या विषाणूच्या प्रसारने जगात थैमान घातले आहे ,गेल्या तीन चार दिवसात या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रातही झाला असून मुंबई ,पुणे ,नाशिक पाठोपाठ आता औरंगाबाद मध्ये सुद्धा संशयित रुग्ण आढळल्याच्या बातम्या येत आहेत. त्याच्या प्रसाराचा वेग पाहता लवकरच अहमदनगर जिल्ह्यात याचा शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जनमानसात घबराटीचे वातावरण असून अफवांचे पेव फुटले आहे.
भारतात व महाराष्ट्रात अजून पर्यंत एकही रुग्ण या विषाणूमुळे दगवल्याची नोंद नसतांना लोक अफवांवर विश्वास ठेवून प्रचंड दहशतीखाली आहेत , अहमदनगर मध्ये अजून एकही रुग्णाला याची लागण झाली नसल्याचे कालच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जाहीर केले आहे. तरी विद्यार्थ्यांच्या मनातील या विषाणूची दहशत कमी करण्यासाठी आणि सर्वच ग्रामस्थांना योग्य ती काळजी घेण्याची माहिती देण्यासाठी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे विद्यार्थ्यांची ‘कोरोना विषाणू जनजागृती फेरी’ काढण्यात आली. ‘अफवांवर विश्वास ठेवू नका ,घाबरून जाऊ नका’ , ‘साबणाने हात स्वच्छ धुवा , ‘खोकतांना तोंडावर रुमाल हवा’ आशा घोषणा देत विद्यार्थी पालकांच्या घरापर्यंत गेले , कोरोनोच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे , लक्षणे कोणती आणि लक्षणे असल्यावर काय केले पाहिजे ,हे विद्यार्थ्यांनी पालकांना ,ग्रामस्थांना सांगितले.
“आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने याविरुद्ध जनजागृती करून हा विषाणू पळवून लावूयात , कोणीही घाबरण्याचे कारण नाही, आपल्या परिसरात हा संसर्ग अजून कोणाला झाला नाही ,आणि जरी झाला तरी हा पूर्णपणे बरा होणार संसर्ग आहे .” असे मुख्यध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“सर्दी खोकला असेल तर तात्काळ उपचार घ्या ,गर्दीच्या ठिकाणी ,यात्रा जत्रेला जाणे टाळा ,अंडी मास खाणे टाळा ,साबणाने हात वारंवार धुवा आणि काळजी घेऊन स्वतःचा व परिसराचा या विषाणू पासून बचाव करा .” असे नारायण मंगलारम म्हणाले.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर