जय जवान ,जय किसन ,जय विज्ञान
जय जवान ,जय किसन ,जय विज्ञान – अर्थात ‘रक्षाबंधन सैनिकांबरोबर’ ,’रक्षाबंधन – वृक्ष बंधन’ आणि इसरोच्या संशोधकांना राख्या व भेटकार्ड….
यंदाचा १५ ऑगस्ट म्हणजे दुग्ध शर्करा योग ,राष्ट्र भक्तीची जाण निर्माण करणारा स्वतंत्र दिन आणि भावा बहिणीच्या प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन ,या दोन्ही दिनांच्या औचित्याने आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे विद्यार्थ्यांचा राख्या बनवणे आणि भेटकार्ड बनवण्याचा उपक्रम घेतला .आमच्या गोपाळवाडीचे भूमी पुत्र सीमा सुरक्षा बलाचे जवान मेजर दीपक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यांच्याबरोबरच रक्षाबंधन साजरा करण्याचे नियोजनही झालेले ,पण काश्मीरमधील चिघळलेल्या परिस्थितीत मेजर दीपक गायकवाड यांना हजर होण्याचे आदेश आले आणि त्यांनी तिकडे निघाल्याचे कळवले मग आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी यंदाच्या स्वतंत्रदिनाच्या औचित्याने तयार केलेल्या तिरंगी राखी त्यांना बांधण्याचे आणि त्याच राख्या त्यांच्या सीमा सुरक्षा बलाच्या तुकडीला देण्याचे नियोजन केले,त्या प्रमाणे आज स्वतंत्रदिनाच्या आणि रक्षा बंधनाचा पूर्व संध्येला शाळेत ‘रक्षाबंधन सैनिकांचे’ हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भारताचे दुसरे पंतप्रधान लाला बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान ,जय किसान’ हा नारा दिला होता. आज आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाने मानवाने स्वतः समोर उभे केलेले संकट पहात आहोत ,कुठे पाण्याच्या टंचाईने भीषण दुष्काळ तर कुठे अती वृष्टीने महापुराचे महासंकट – या सारख्या संकटावर मात करायची असेल तर निसर्गावर अतिक्रमण न करता त्यांचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे ,हा विचार आजच्या दिवशी विद्यार्थ्यांत रुजला पाहिजे म्हणून आजच्या दिवशी शाळेच्या परिसरातील वृक्षाला मोठ्ठी राखी बांधून ‘रक्षाबंधन ,वृक्ष बंधन’ हा ही उपक्रम घेण्यात आला.
जय जवान ,जय किसन यालाच जोडून जय विज्ञान हा नारा दिला होता भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी – त्याची प्रचिती म्हणून आज आपण भारताने विविध वैज्ञानिक क्षेत्रात केलेली प्रगती पाहतच आहोत. नुकतेच आपल्या अवकाश संशोधन संस्था ‘इसरो’ ( ISRO ) ने चांद्रयान -२ चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे आणि आज उद्यात ते चंद्रावर पोहचणार ही आहे ,असे केल्यावर चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरणार आहे ,ही अभिमानास्पद कामगिरी आपल्यासाठी ज्यांनी केली त्या इसरोचे प्रमुख डॉ के शिवान आणि त्यांच्या संपूर्ण टीम साठी ही विद्यार्थ्यांनी अभिनंदनचे ,स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छाचे भेटकार्ड आणि राख्या बनवल्या त्याही आज त्यांना पाठवण्यात आल्या.
अशा प्रकारे एकाच वेळी ‘जय जवान ,जय किसन आणि जय विज्ञान’ हा जयघोष विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवला …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी ,
ता राहुरी ,जि अहमदनगर.