राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव, स्वामी विवेकानंद जयंती ,युवक दिन
राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव
आणि
स्वामी विवेकानंद जयंती ,युवक दिन
आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे ‘जिच्या सोनेरी कुशीतून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले ,ज्यांनी स्वराजला दोन दोन छत्रपती दिलेत, अशा
🌷 राजमाता जिजाऊ माँसाहेब 🌷
यांचा जन्मोत्सव आणि संपूर्ण जगात हिंदू धर्माची पताका गौरवाने फडकवणारे युवकांचे प्रेरणास्थान
🌷 स्वामी विवेकानंद 🌷
यांची जयंती अर्थात युवक दिन मोठा आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला…!!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेडगांव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीम हिराबाई ज्ञानदेव जाधव या तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीम कुसुम बाळासाहेब कुर्हे ,श्रीम संगीत बाबासाहेब जाधव,श्रीम रुक्मिणी सुरेश जाधव ,व्यवस्थापन समिती सदस्य श्री बबन कुर्हे ,श्री प्रमोद हापसे ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस श्रीम छायाबाई कुर्हे आणि शाळेच्या शिक्षिका श्रीम उज्वला वदक मॅडम आणि शाळेचे माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते ….!!
या प्रसंगी 3 रीचा ओंकार गायकवाड ,4 थी चा दिनेश हापसे ,4 थीचा कृष्णा कुर्हे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी विचार सांगितले तर इ 2 री ची मृणाल हापस व इ 4 चा दिनेश हापसे यांनी जिजाऊंच्या विचाराचे दर्शन घडवणारी एक छोटी पण अत्यंत मोलाचा संदेश देणारी नाटिका सादर केली …..!!
शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम वदक मॅडम अत्यंत ओघवत्या भाषेत आणि आकर्षक शैलीत जन्मोत्सवाच्या आणि युवक दिनाच्या कार्येक्रमांची सूत्रसंचालन तर केलेच पण त्याच बरोबर त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ आणि स्वामीजींच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली ,श्री मंगलारम सर यांनीही विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवित कार्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले …..!!
आजच्या कार्येक्रमासाठी खास विद्यार्थ्यांच्या भेटीला राजमाता जिजाऊची वेशभूषा करून इ 4 थी ची कु प्राजक्ता हापसे हिने ‘मी राजमाता जिजाऊ बोलतेय’ ,इ 4 थी चीच कु स्नेहल कुर्हे हिने ,’साक्षात जिजाऊ’ हे सुंदर सादरीकरण करून जिजाऊचे स्वराज्यविषयी ,आपल्या जडणघडणी विषयी आणि रयते विषयीचे विचार सर्वांपर्यंत पोहचवून उपस्थितांची वाह वाह मिळवली….!!
“अंधार फार झाला एक दिवा पाहिजे ,
या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे…!!”
पण जर छत्रपती जन्मायला हवे असतील तर आधी राजमाता जिजाऊ जन्मल्या पाहिजे ,म्हणून मुलींच्या जन्माचे स्वागत करा ,’लेक वाचवा ,लेक शिकवा ….!!’ असा संदेश ही देण्यात आला.
जिजाऊ जन्मोत्सव आणि युवक दिनाच्या औचित्यावर उपस्थित सर्व जिजाऊच्या लेकींचे शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलं ……!!
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा राजकीय , सामाजिक ,अध्यात्मिक वारसा पुढे नेण्याच्या निर्धारासह कार्येक्रम संपला …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अ नगर