राष्ट्रीय विज्ञान दिवस
_२८ फेब्रुवारी २०२०_
🔭🔬🔎🧪⚙️💡📡
बाबांनी आजारी माणसावरून मंत्र उच्चारून त्रिशूल तांदळाच्या गडवीत खुपसल आणि त्रिशूल त्या तांब्यासह वर आलं. मग खरंच करणी करून मूठ मारतात का ?
तुला बाहेरची बाधा झाली आहे हे बघ असं म्हणत माथ्याला लावलेली हळद लगेच लाल झाली , मग यात हातातली हळद अचानक लाला कशी होते ?
अशीच तऱ्हा कुंकवाची अंगावरून फिरवलेलं कुंकू अचानक काळ पडलं , इथं हातातलं कुंकू काळ का पडत ?
तुला बाहेरच केलं आहे ,लिंबू मारला आहे असे म्हणून भोंदू बाबा लिंबू कापतात आणि त्यातून रक्त यायला लागत , असं लिंबू कापला की त्यातून रक्त कसं येतं ?
असे अनेक अंधश्रद्धा निर्माण करणारे प्रसंग विद्यार्थ्यांच्या आजूबाजुला घडत असतात , या मागे विज्ञान आहे हे अहित नसल्याने काही वेळा त्यांना हा करणी ,काळी ज्यादूचा प्रकार वाटतो भोंदू बाबाच्या नादी लागून लोक बरबाद होतात.
या मागचा कार्यकारण भाव आणि विज्ञान समजण्यासाठी आज शाळेत ‘राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर सी.व्ही.रमण यांनी जगासमोर मांडला तो दिवस म्हणजे २८ फेब्रुवारी…
सर चंद्रशेखर व्यंकट रमण अर्थात सी. व्ही. रमण यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. पदार्थावर प्रकाश किरण टाकले असता पदार्थाची संकल्पना व गुणधर्मानुसार त्यांचे विकिरण होते. ही बाब त्यांनी प्रत्यक्ष पुराव्यानिशी आजाच्याच दिवशी सिद्ध केली…..
काही प्रमाणात दैववादी असणाऱ्या भारत देशासाठी ही एक विज्ञानवादाकडे घेऊन जाणारी नवी पहाट होती आणि याचेच फलित म्हणून भारत सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून जाहीर केलेला आहे.
पुढे १९५४ साली या थोर संशोधक शास्त्रज्ञांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन देखील गैरविले….
आजच्या या विज्ञान दिनाच्या निमित्ताने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ,ज्यात मुलांना काही सोपे आणि छोटे प्रयोग करून दाखवले . भोंदू बाबा लोक कशा पद्धतीने विज्ञानातील सोपी तंत्रे वापरून लोकांना फसवतात हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना , ‘हातातील हळदीचे कुंकू होणे आणि कुंकू काळे पडणे’ , ‘लिंबू कापताच त्यातून रक्त येणे , ‘तांब्यात त्रिशूल अडकून बसने’ असे काही प्रयोग करून दाखवले ,त्यामागचे वैज्ञानिक कारणही सांगितले.
विद्यार्थ्यांनी ही या वेळी काही सोपे प्रयोग सादर केले , साधना जगधने या विद्यार्थिनीने , ‘हवा जागा व्यापतो हा प्रयोग मेणबत्ती ,रंगीत पाणी आणि काचेचा ग्लास वापरून सादर करून दाखवला’ , तर अजित बाबासाहेब ब्राम्हणे याने पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असले की वस्तू तरंगते हा प्रयोग सादर केला. साईराज महेश तरावडे याने ज्यादुई शाई हा लिंबाच्या रसाच्या शाईचा वापर करून प्रयोग सादर केला.
“प्रत्येक गोष्टोकडे आपण चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे ,त्याच्या मागचा कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे ,हे घडले तर असेच का घडले असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत विद्यार्थी मार्गदर्शनात म्हणाले.
“गरज ही शोधांची जननी आहे तसेच प्रत्येक शोध हा माणसाच्या अचूक निरीक्षण शक्तीमुळे लागला आहे तेव्हा आपण चांगलं निरीक्षण करण्याची आणि घडलेल्या घटनांमागचे कारण शोधण्याची सवय लावून घेतली पाहिजे .” असे नारायण मंगलारम म्हणाले.
विद्यार्थिनींनी या वेळी काही सुंदर विज्ञान रांगोळ्या देखील काढल्या होत्या , स्वरांजली रमेश जाधव या विद्यार्थिनीने प्रदूषणाचे भीषण परिणाम दाखवणारे सुंदर मॉडेल देखील बनवून आणले होते. शेवटी राष्ट्रीय विज्ञान परिषदेने तयार केलेल्या विज्ञान गीताच्या गायनाने नवी वैज्ञानिक दृष्टी देणाऱ्या आजच्या ‘राष्ट्रीय विज्ञान दिनाचा’ समारोप झाला.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर