एक रंगपंचमी अशी ही
*एक रंगपंचमी अशी ही ….*
“रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे…
सर्वप्रथम रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा !!!
रंगपंचमी ,रंगांचा सण तसे विद्यार्थी धुलीवंदनलाच रंग खेळतात पण आजही काही ठिकाणी रंग खेळले जातात , अशात अनेक घातक रंग वापरून चेहरा खराब करून घेण्यापेक्षा आकर्षक चेहरा रंगवून रंगोत्सव साजरा करण्याचा निश्चय आम्ही केला आणि मग काय धमाल रंगवले काही चिमुकल्यांचे चेहरे ,सर्वच विद्यार्थी इच्छूक होते पण मधल्या सुटीच्या एक तासात सहा जणांचे चेहरे रंगवले.
“उरले सुरले क्षण जेवढे,
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू…..!!”
रंगपंचमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा…!
जि प प्रा शा गोपाळवाडी येथील चिमुकल्यांची आकर्षक face painting पहा तर एकदा ,एक रंगपंचमी अशी करूनही विद्यार्थ्यांनी धमाल केली ……!!
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर