राजा शिवछत्रपती जयंती उत्सव २०१९
🚩 *राजा शिवछत्रपती जयंती* 🚩
*उत्सव-२०१९*
*”प्रौढ प्रताप पुरंदर”*
*”महापराक्रमी रणधुरंदर”*
*”क्षत्रिय कुलावतंस्”*
*”सिंहासनाधीश्वर”*
*”महाराजाधिराज”*
*”महाराज”*
*”श्रीमंत”*
*”श्री”*
*”श्री”*
*”श्री”*
*”छत्रपती”*
*”शिवाजी”*
*”महाराज”*
*”की”*
*”जय”*
*”जय जिजाऊ , जय शिवराय”*
*’शिवरायांचे आठवावे रूप !'”*
*शिवरायांचा आठवावा प्रताप !*
*शिवरायांचा आठवावा साक्षेप !*
*भू मंडळी*
असे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,युगप्रवर्तक ,शककर्ता गडपती ,गजअश्वपती ,भूपती ,प्रजापति ,बुद्धी आणि शक्तीचे अधिपती कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती …..!!
आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी शाळेत शककर्ता ,युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य श्री सीताराम जाधव ,माजी सदस्य श्री बाळासाहेब जाधव ,महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी सहायक श्री शंकरराव जाधव ,श्री संजय जाधव आणि मोठ्या संख्येने तरुण वर्ग ,ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नंतर विद्यार्थी मनोगत – ‘रयतेच्या भाजीच्या देठाला ही हात न लावणारा ,ज्यांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही ,एकही भिकारी राज्यात नव्हताअशा राजाचा काळ म्हणजे माझ्या राजाचा – शिवाजी महाराजांनीच काळ – जय जिजाऊ ,जय शिवराय ….!!
वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या शिवरायांच्या स्वराज्यात ३०० पेक्षा अधिक किल्यांचे अभेद्य स्वराज्य निर्माण केले …!!
वतने वाटून वतनदारी निर्माण करण्यापेक्षा – दरमाहा वेतन देऊन वेतनदारी पद्धत निर्माण करणारा पहिला राजा ….!!
पहिल्या भारतीय आरमाराची स्थापना करणारे म्हणून ज्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात असे राजे म्हणजे – छत्रपती शिवाजी महाराज ….!!
शिवकालीन किल्ले ,पाणीपुरवठा या गोष्टी कालातीत आहेत ….!!
अशी वेगळी आणि अभिनव माहिती शिवरायांविषयी देऊन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ….!!
शंकर जाधव यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वानाच मार्गदर्शक असून शालेय वयात आपण तो जास्तीत जास्त चांगला समजून घेतला पाहिजे असे सांगितले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर यांनी गड किल्ले ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून आपण जसे शक्य होईल तसे या गडकोटाना भेटी देऊन महाराजांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे असे सांगितले …..!!
शेवटी शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक चित्तथरारक प्रसंग ‘ अफजल खानाचा वध ‘ या प्रसंगावर आधारित पोवाड्याचे नाटयीकरणासह सादरीकरण करून ,जय जिजाऊ ,जय शिवराय या घोषणांनानी आसमंत गर्जत शिवछत्रपतींच्या जयंतीचा हा उत्सव संपन्न झाला …..!!
शिवछत्रपती जयंती उत्सवाची एक झलक पाहण्यासाठी वरील लिंकला जरूर स्पर्श करा ….!!
*शब्दांकन*
*नारायण मंगलारम*
*जि प प्रा शा गोपाळवाडी*
*ता राहुरी ,जि अहमदनगर*