जेव्हा चित्ता ,हत्ती आणि गेंडा घेतात वर्गावर तास ……
Augmented reality based application education in classroom
जेव्हा चित्ता ,हत्ती आणि गेंडा घेतात वर्गावर तास ……
स्वप्नात पहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसला नाग
हरणाच्या बरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते ….
विंदांच्या या कवितेतील चित्ते मस्त हरणाबरोबर पत्ते खेळत बसल्याचे आपण म्हणतो ते म्हणून , ऐकून आणि वाचून चिमुकल्याच्या चेहऱ्यावर उमटणारे आश्चर्य आणि आनंदाचे भाव लपता लपत नाहीत ….!!
पण जर खरंच हा चित्ता वर्गात आला तर …!! ऐकूनच अंगावर शहारें आले ना ,पण आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे दुपारच्या सत्रात तास घ्यायला वर्गात साक्षात हा चित्ता , हत्ती आणि एक शिंगी गेंडाच आला आणि आमच्या चिमुकल्या लेकरांची एकच धांद्दल उडाली….!!
इयत्ता 3 रीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील ‘निवारा आपला आपला’ हा पाठ शिकवत असताना ‘आयता निवारा शोधणारे प्राणी’ या उपघटकात – वाघ ,बिबट्या ,तरस या जंगली प्राण्यांचा उल्लेख आला आणि मग मुलांनी ही आपल्या घराच्या परिसरात बिबट्या आल्याचे ,वाघ दिसल्याचे ,सर्कशीत हत्ती पाहिल्याचे सांगायला सुरुवात केली .मग मी म्हणालो की तोच बिबट्या / चित्ता किंवा हत्ती जर आपल्या वर्गात आला तर ….,हो सर ,बोलवा सर असा एकचं गिल्ला लेकरांनी केला ….!! आणि मग काय आम्ही सुद्धा Safari Central या प्ले स्टोर वर उपलब्ध असणाऱ्या AR अँप च्या मदतीने वर्गात हा चित्ता ,हत्ती ,एक शिंगी गेंडा तास घेण्यासाठी बोलवून घेतला…!!
“वर्गाभर फिरणारे हे प्राणी ,त्यांचा तो आवाज ऐकून बच्चेकंपनी एकदम जाम खुश झाली ….!! जंगलात ,सर्कशीत किंवा पिंजऱ्यात दिसणारे हे प्राणी आपल्या वर्गात फिरतांना पाहून विद्यार्थी हरखून गेले …..!!” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत हे म्हणाले
“या साठी आपल्याला प्ले स्टोर वरून Safari Central हे ऑग्यूमेन्ट रियालिटी बेस अँप घ्यावे लागेल त्याची मार्कर इमेज म्हणून आपण आपल्या भारतीय चलनातील 100 रुपयांची नोट वापरू शकतो ,अँप उघडून आपण सफारीतील हवा तो प्राणी निवडू शकता ,त्या नंतर उघडलेल्या कॅमेऱ्यातून आपण 100 रुपयांची नोट स्कॅन केली की आपल्याला तो प्राणी वर्गात आलेला दिसेल…” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
“अशा नवनवीन अध्ययन अध्यापन पद्धतींचा ,तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज असून त्याने विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व रुंदवायला मदत होईल” असे राहुरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे म्हणाल्या.
केंद्रप्रमुख थोरात साहेब ,विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर साहेब ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,महेश तारवडे आदींनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले .
Safri Central अँप इन्स्टॉल करणे व वापरण्याची पद्धत…
1 )प्ले स्टोर वरून Safari Central हे अँप इन्स्टॉल करा
2 )अँप ओपन केल्यावर Tap to start ला स्पर्श करा
3 )आपल्याला स्क्रिनवर 6 प्राणी दिसतील त्यातील ज्या प्राण्याला आपल्याला वर्गात बोलवायचे त्याच्या चित्राला स्पर्श करा …
4 )Get Started येईल त्यात Got it ला स्पर्श करून दोनदा Continue ला स्पर्श करा …
5 )कॅमेरा ओपन होऊन [ Frame a target ] तिथे विविध 15 देशाच्या चलनी नोटा या टार्गेट म्हणून काम करतात त्यात आपल्या भारतातील ₹ 100 ची चलनी नोट टार्गेट च्या फ्रेम मध्ये धरा ….
6 )आपण निवडलेला प्राणी आपल्याला आवाज करत वर्गात आलेला दिसेल ….
7 )आपण मोबाईलवर जिथे स्पर्श करू तो प्राणी तिथे जातांना आपल्याला पाहायला मिळेल..
Augmented Reality बेस्ड या अँप च्या मदतीने आपण हे जंगली प्राणी आपल्या वर्गात ,विद्यार्थ्यांत फिरत असल्याचे अनुभव विद्यार्थ्यांना देऊ शकतो ……🙏🏻🙏🏻🙏🏻
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर