गोपाळवाडीच्या शाळेत अवतरली ‘ग्रहमाला’
अवघ्या काही दिवसांपूर्वी नासाच्या रोव्हर बरोबर मंगळाच्या सफरीवर निघालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरीत आज चक्क सूर्य ,बुध ,शुक्र ,पृथ्वी आणि मंगळाला घेऊन ‘ग्रहमाला’ अवतरली…!!
दफ्तरमुक्त शनिवार आणि आनंददायी शिक्षणाच्या संकल्पनेतून आज शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलर होते. आजची शिक्षणपद्धती विसाव्या शतकातील असून ,त्यात व आजच्या व्यवहार ज्ञानात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे.जो शिकण्यासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरून ,अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया मजेदार करतो तोच खरा शिक्षक व त्यासाठी शिक्षकाने नेहमी स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.शिवाय विद्यार्थ्याला स्वतः विचार करता यावा,त्याच्या कल्पकतेला वाव मिळावा ही उद्दिष्ट्ये समोर ठेवूनच शिक्षकाने काम केले पाहिजे.याच सर्व गोष्टींची जाण ठेवून विविध नवनवीन प्रयोगाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ,तंत्रज्ञानाचा वापर करत ज्ञानदानाचे काम राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी केले आहे.
इतिहास भूगोल हा निरस वाटणारा विषय तंत्रज्ञानाच्या यथायोग्य वापर करून सोपा करता येतो आणि त्यात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करता येते हे त्यांनी प्रत्यक्ष सूर्यमाला वर्गात आणून सिद्ध करून दाखवले आहे.खगोलशास्त्र हा एक प्राकृतिक विज्ञानाचा भाग आहे. खगोलशास्त्रात आपल्याला विविध ताऱ्यांच्या व ग्रहांच्या बाबतीत माहिती मिळते.खगोलीय वस्तू म्हणजे माणसाला माहीत असणाऱ्या अवकाशातील वस्तू यामध्ये तारे ,ग्रह ,उपग्रह ,धूमकेतू ,उल्का इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थ्याला खगोलीय एखादा घटक शिकवायचा असेल ,तर प्ले स्टोरवर कितीतरी त्यासंदर्भात अँप आहेत त्या अँपचा वापर करून खगोलीय सूर्यमाला प्रत्यक्ष वर्गात अवतारण्याची किमया आज गोपाळवाडी शाळेत घडली ,”पुस्तकातील ही ग्राहमाला प्रत्यक्ष आपल्या वर्गात अवतलेली पाहून विद्यार्थ्यांना त्या घटकाची अधिक माहिती घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.त्यामुळे हा घटक विद्यार्थ्यांना आवडीचा होऊन तो त्यांना चिरकाल स्मरणात राहील” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“आपण ज्या ग्रहावर आपली नावे पाठवली तो लाल दिसणारा मंगळ ग्रह ,कडी असलेला शनी ग्रह ,सर्वात मोठा गुरू ग्रह ,आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी -त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे सगळं पाहून विद्यार्थी चकित झाले.या खगोलीय संकल्पना समजण्यास त्यांना निश्चितच अधिक मदत होईल.” असे नारायण मंगलारम हे म्हणाले.
आनंददायी अध्यापन आणि तंत्रज्ञानाच्या अशा सकारात्मक वापराबद्दल गटशिक्षणाधिकारी सुलोचना पेटारे मॅडम ,विस्तार अधिकारी अर्जुन गारूडकर साहेब केंद्रप्रमुख थोरात साहेब ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव ,सीताराम जाधव ,महेश तरवडे आदींनी शाळेतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
2 Comments
Shilpa M Waghmare
It’s an amazing experience… Too much fun with education…
Hats off to you da
Narayan Mangalaram
धन्यवाद