भगत सिंग जयंती 2019
“जिंदगी तो अपने दम परही जी जाती है ,
दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठते है …!!”
सरदार भगत सिंग यांचे जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या या त्यांच्याच पंक्ती.
‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है ,
देखना है जोर कितना ,बाजूए कातिल मे है…!!’
रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या या ओळींसारखे बाणेदार वृत्तीने ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही ,अशा ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारे शाहीदे आजम सरदार भगतसिंग यांची आज जयंती…..!!
त्यानिमित्त आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी मध्ये जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता , “भगत सिंग यांच्या जन्म तात्कालिक हिंदुस्थानच्या पंजाब प्रांतात आजच्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर 1907 ला एका देशभक्त कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले ,त्यातून पुढे चालून त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या बरोबर ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. लाहोर येथे सँडर्स ह्या जुलमी इंग्रज पोलीस अधिकाऱ्याची राजगुरू व सुखदेव यांच्या सहकार्याने हत्या त्यांनी केली ,तसेच आपला आवाज साम्राज्यवादी ब्रिटीशांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी सेंट्रल असेंबलीत कोणालाही दुखापत होणार नाही अशा पद्धतीने बॉम्ब स्फोट घडवून आणला आणि ‘बहिऱ्या साम्राज्यवादी शासनाला आपला आवाज एकवण्यासाठी तिथून पळून जाण्याऐवजी स्वतःला अटक करून घेतली” अशी भगत सिंग यांच्या जीवनाविषयीची थोडक्यात माहिती ,शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी दिली.
“भगत सिंग 12 वर्षाचे असतांना अमृतसर जवळ जालियानवाला बाग हत्याकांड घडले ,त्याचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला ,त्यांनी क्रांतीचा मार्ग अवलंबून देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत 23 मार्च 1931ला लाहोर येथे फासावर चढून स्वतंत्र यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली.” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनीही भगत सिंग यांच्या जीवनातील छोट्या प्रसंगातून त्यांचे जीवित कार्य समोर आणण्याचा प्रयत्न केला ,अजित ,प्रियांका ,कृष्णा ,स्वरांजली ,मंजू आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. भगत सिंग यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने या थोर क्रांतीकारकाला आदरांजली अर्पण केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली .
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर