रक्तदान आहे जीवनदान
“रक्तदान आहे जीवनदान ,
तेच वाचवते दुसऱ्याचे प्राण…!!”
“मतदार राजा जागा हो ,
लोकशाहीचा धागा हो …..!!”
अर्थात
ऐच्छिक रक्तदाता दिन
मतदार जनजागृती मोहीम
आज मंगळावर 1 ऑक्टोबर 2019 आपल्या भारतात ‘ऐच्छिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा केला जातो ,तसेच सध्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 ची तयारी चालू आहे ,या निमित्ताने रक्तदाता आणि मतदाता जनजागृती करण्यासाठी, आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी शाळेची ‘रक्तदान आणि मतदान जनजागृती प्रभात फेरी’ आज काढण्यात आली .
‘जीवनातील रक्ताची आवश्यकता आणि रक्तदानाचे महत्व ध्वनित करण्यासाठी 1975 पासून ‘इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफूजन अँड इम्यूनोहैटोलॉजी च्या वतीने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो .
ऐच्छिक रक्तदानाचे महत्व लोकांना पटवून देणे ,त्याची गरज आणि रक्तदानाने दिले जाणारे जीवनदान या विषयी जागरूकता निर्माण करणे ,रक्तदनाविषयच्या गैरसमजुती दूर करणे ,अधिकाधिक लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे हे हा दिन साजरा करण्याची मुख्य उद्दिष्टे आहेत.
त्यानिमित्ताने आमच्या शाळेत आम्ही प्रभात फेरीचे आयोजन केले ,’रक्तदान ,श्रेष्ठ दान’ , ‘दानात दान ,रक्त दान’ , ‘करून दान रक्ताचे ,जोडू नाते बंधुत्वाचे’ ‘रक्तदान करू ,जीवनदान करू’ ,’नवे वारे ,नवी दिशा ,मतदानाच आहे उद्याची आशा’ , ‘मतदानासाठी वेळ काढा ,आपली जबाबदारी पार पाडा’ आशा घोषणा आणि फलक दाखवत विद्यार्थ्यांनी रक्तदाना ,मतदान विषयी जनजागृती केली.
रक्तदान कोण करू शकते हे सांगताना ,”ज्यांचे वय 18 ते 60 च्या दरम्यान आहे ,ज्यांचे वजन 48 किलो पेक्षा अधिक आहे आणि हिमोग्लोबिन 12.50 पेक्षा अधिक आहे असे सर्व निरोगी स्त्री – पुरुष रक्तदान करू शकतात. रक्तदान आणि मतदान हे दोन सर्वात पवित्र दान आहेत ,ती आपण नक्की केले पाहिजे.” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“मी स्वतः नियमित रक्त दाता आहे , आपण ही नियमित रक्तदान केले पाहिजे ,दर तीन महिन्यांनी आपण रक्तदान करू शकतो ,त्याने कुठल्याही प्रकारची कमजोरी ,अशक्तपणा येत नाही ,तेव्हा प्रत्येकाने आयुष्यत एकदा तरी रक्तदान केले पाहिजे. त्याच प्रमाणे मतदान हा आपल्याला लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे ,आपला मतदानाचा हक्क बजावून आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. ” हे नारायण मंगलारम यांनी गावतील पालक आणि नवतरुणाना सांगितले.
उपस्थित ग्रामस्थ व तरुणांनी ऐच्छिक रक्तदानाचा आणि मतदानाचा संकल्प करून हा दिन संपन्न झाला.