गोकुळाष्टमी – गोपाळवाडीची
गोकुळाष्टमी – गोपाळवाडीची
दहिहंडी.
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा मानबिंदू.
आमच्या गोपाळवाडीच्या ‘गोपाळ’ समाजाचा सगळ्यात मोठा उत्सव ….!
गेल्या आठवड्याभरा पासून इथल्या कृष्ण मंदिरात जन्माष्टमी निमित्त सप्ताह चालूच आहे ,आज ‘काला’ मग आपल्या चिमुकल्यांचा ‘गोकुळाष्टमी ,दहीहंडी’ चा कार्यक्रम घेण्याचा विचार राऊत सरांनी बोलून दाखवला ,तो विद्यार्थ्यांनी अगदी जल्लोषात उचलून धरला ….!
गोकुळाष्टमी ,दहीहंडी साठी आमचे चिमुकले आज अगदी सुरेख सजून धजून आले होते ,इयत्ता पाहिलीच्याच मंजू हापसे ,श्रावणी हापसे ,श्वेता गवांदे ह्या तर अगदी राधेसारख्याच दिसत होत्या ….!
मग आम्ही पण आमच्या पृथ्वीराजला कृष्णाचा मेकप केला ,मोरपीस असलेला मुकुट त्याच्या माथ्यावर चढवला आणि सगळ्यांनी मंजूला राधा करा असा गिल्ला केला ,झाले तयार आमचे राधा कृष्ण …..!
तो पर्यंत राऊत सरांनी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने फुगे ,हार यांनी सुंदर सजवली दहीहंडी बांधून घेतली ,तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा पहिला टप्पा केला आणि बारक्या शरीरयष्टीचा निलेश लगेच हंडी फोडायला वर चढला …..!
पुढे ,मागे ,खाली वर करता करता शेवटी निलेश बरोबर हंडी पर्यंत पोहचला पण उंची मुळे त्याचा हात काही हंडीला लागत नव्हता ,मग काय एक लाकडी पट्टीच्या साहाय्याने निलेशने फोडली हंडी आणि लेकरांनी एकच गिल्ला केला ,केल्याचा प्रसाद उधल्यावर तो लोटण्यासाठी लेकरांची मजेशीर धावपळ झाली ….!
या सगळ्यातून कोणाला 2 कोणाला 3 ,कोणाला 4 तर कोणाला 7 चॉकलेट मिळायलाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ….!
इयत्ता पाहिलीतच असणाऱ्या चिमुकल्या श्वेताने राधा झालेल्या आपल्या मैत्रिणीला मंजूला 3 चॉकलेट देऊन एका वेगळ्याच सहृद्यतेचे दर्शन घडवले…..!
हंडी नंतर राऊत सरांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माची कथा थोडक्यात सांगून ,दहीहंडीच्या उत्सवाचे सांस्कृतिक महत्व सांगितले तसेच आजच्या आधुनिक युगात आपण श्रीकृष्ण उपदेशावर चालतांना विद्यार्थी म्हणून विद्या घेण्याचे आपले कर्तव्य सर्वात निष्ठेने केले पाहिजे हे ही सांगितले ….!
कृष्ण राधेच्या वेशातील आमुच्या चिमुकल्यांच्या रुपात आज गोपाळवाडी शाळेत साक्षात *गोकुळ* अवतरले.आमच्या विद्यार्थ्यांकडे कौतुकानं बघणार्या नजरा बघून मस्त वाटले.कृष्णाकडून दुसऱ्या थरावर दहिहंडी फोडल्यावर एकच जल्लौष झाला.गरबा व पारंपरिक फुगडी व नृत्यावर विद्यार्थी व शिक्षकांनीही ताल धरला. *गोपाळकाल्याचा* प्रसाद सगळ्यांनी घेतला
*शब्दांकन*
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी, जि अहमदनगर