अनीतीवर नीतीचा विजयोत्सव
‘पर्यावरणा समोरच्या दशननांचे दहन’
‘विजयादशमी’
अर्थात
‘अनीतीवर नीतीचा विजयोत्सव’
उद्या विजयादशमी ,दसरा अर्थात ‘असत्यावर सत्याच्या’ , ‘अनितीवर नीतीच्या’ , ‘अनाचारावर सुआचाराच्या’ विजयाचा दिवस त्यानिमित्ताने आज सोमावर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे विजयादशमी उत्सव अतिशय आनंदात, उत्साहात आणि ‘ पर्यावरणासमोरच्या दशाननचे दहन ‘ करून साजरा करण्यात आला.
‘हवामानातील बदल’ हा पर्यावरणाचा सर्वात मोठा राक्षस आज समस्त मानवजातीसमोर उभा आहे ,त्या बरोबरच परिसंस्था आणि दुर्मिळ प्रजाती नष्ट करणारा ,बेसुमार जंगल / वृक्ष तोड करणारा ,सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारा ,बेसुमार / अनियांत्रित शहरीकरणाचा भस्मासुर ,कचऱ्याची समस्या निर्माण करणारा ,लोकसंख्या विस्फोटाचा भस्मासुर ,जैव विविधतेची हानी करणारा ,जल प्रदूषण करणारा आणि वायू प्रदूषण करणारा असा आधुनिक ‘पर्यावरण समोरचा दशानन’ याचे दहन नवरात्रीच्या निमित्ताने आजच्या आधुनिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या भारतात दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या ‘नवदुर्गानी’ केले.
पर्यावरणाच्या क्षेत्रात अफाट कामगिरी करणाऱ्या आपल्या भारतातील आधुनिक नावदुर्गांची या निमित्ताने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली ,या दशननांच्या दहनासाठी आमच्या शाळेत आज कोण कोण आलं होतं , तर सुनीता नारीन ,रिधिमा पांडे ,सल्लूमारदा तिमक्का ,पौर्णिमा बर्मन ,वंदना शिवा या सारख्या पर्यावरणाच्या क्षेत्रातील आधुनिक दुर्गा …..!!
“आज जगात पर्यावरणाच्या समस्येने डोके वर काढले आहे ,शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा झपाट्याने होणार ऱ्हास थांबवणे अतिशय आवश्यक आहे ,तेव्हा पर्यावरनासमोरच्या खऱ्या समस्या विद्यार्थ्यांच्या लक्षात याव्यात यासाठी आम्ही आज हा दहन आणि विजयोत्सव आयोजित केला” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत जगाबरोबर भारतीय महिला ही मागे नाहीत , आता 11 वर्षची असणारी आणि वयाच्या 9 व्या वर्षीच पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठवणारी उत्तराखंड मधील भारताची ग्रेटा ‘रिधिमा पांडे’ , ‘Down to earth’ या पक्षीकाच्या संपादक आणि विज्ञान आणि पर्यावरण केंद्रच्या संचालक जेष्ठ पर्यावरण वादी सुनीता नारीन ,BBC च्या वतीने जगातील 100 प्रभावशाली पर्यावरणवाद्याच्या यादीत स्थान पटकावनाऱ्या आणि चार किलोमीटर हायवे लगत 385 वडाची झाडे लावून ती जगवणार्या 105 वर्षाच्या सल्लूमारदा तिमाक्का , यासारख्या पर्यावरण वादी महिला आणि मुली याच उद्याची खरी आशा आहेत ,त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी आणि पर्यावरण राक्षणात त्यांनीही खारीचा वाटा उचलावा,यासाठी हा उपक्रम घेतला ” असे सांगत शाळेतील उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी या वेळी या पर्यावरणवादी भारतीय महिलांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
वनवासी रामाची वेशभूषा केलेला साईराज तरवडे ,लक्ष्मणच्या वेशभूषेतील कृष्णा जाधव ,सीतेच्या वेशभूषेतील प्रियांका हापसे ,हनुमानाच्या वेशभूषेतील सार्थक जाधव सर्वांचे लक्ष वेधत होते.रिधिमा पांडे होऊन आलेली मंजू हापसे ,सुनीता नारीन होऊन आलेली स्वरांजली जाधव ,सल्लूमारदा तिमाक्का झालेली आरती जगधने ,पौर्णिमा बर्मन झालेली श्रावणी हापसे ,वंदना शिवा झालेली प्राजक्ता या नावदुर्गांच्या हस्ते ‘पर्यावरणा समोरच्या दशाननाचे दहन’ करून नारीशक्तीचा जागर यावेळी मांडण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,आसाराम काळापहाड ,रुक्मिणी जाधव ,रामदास बाबा जाधव यांच्या सह मोठ्यासंख्येने पालक आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर