आनंदाची दिवाळी-दीपोत्सव २०१८
आनंदाची दिवाळी-दीपोत्सव २०१८
“सप्तरंगात न्हाऊन आली ,
आली माझ्या घरी ही दिवाळी….!!”
अशीच सप्तरंगात न्हाऊन ही आनंदाची दिवाळी – दीपोत्सव २०१८ गेल्या तीन दिवसांपासून आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी येथे आली …..!!
दिवाळी हा मांगल्याचा ,पावित्र्याचा ,उत्साहाचा ,ऊर्जेचा आणि आनंदाचा सण ,अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचा सण ,अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा सण हा सण साजरा करत असताना आम्ही सुद्धा आमच्या शाळेत ‘आकाश कंदील’ बनवणे ,भेटकार्ड बनवणे ,पणत्या रंगवणे हे उपक्रम अतिशय आनंदात उत्साहात पार पडला. आज दीप पेटवून अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा क्षण ‘दीपोत्सव २०१८’ साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि जागतिक तापमान वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी इको फ्रेंडिली दिवाळी , फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ सुद्धा या वेळी विद्यार्थी आणि शिक्षणांनी घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे महत्व आध्यत्मिक आणि सामाजिक या विषयी माहिती दिली गोड शा पो आहार देऊन दीपोत्सव संपन्न झाला ,अशा प्रकारे अतिशय अभिनव पद्धतीने शाळेत आज ‘आनंदाची दिवाळी – दीपोत्सव २०१८’ साजरा करण्यात आला ,त्याची काही क्षणचित्रे.
शब्दांकन
नारायण मंगलारम