बाल आंनद मेळावा व खाद्य जत्रा
या गरम गरम समोसा घ्या ….!!
पोंगे घ्या ,१ रुपयांचे १ या या लवकर या ….!!
हलवा ,हलवा ,हलवा …लाल लाल हलवा घ्या ,लाल हलवा ….!!
असं म्हणतात
‘बोलणार्याचे हुलगे विकतात ,
न बोलणार्याचे गहू सुद्धा विकत नाही…!!’
आणि म्हणून असंच अनखी अप्पे ,वडे ,चिक्की ,बोर ,भेळ ,चॉकलेट ,भाजी ,शेंगा ,लाडू आणखी काय नी आणखी काय हे सगळं ओरडून ओरडून विकणारे शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे ग्राहक म्हणून आले होते ,शाळेतीलच इतर विद्यार्थी ,तिळगुळाच्या ,हळदी कुंकवाच्या कार्येक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माता पालक आणि इतर ग्रामस्थ …..!!
दर आठवड्याच्या बाजारात आपल्या पालकांच्या मागे लागून त्यांच्या कडून बाजारातील काही न काही खाऊ मिळवणारी लेकरच आज दुकानदार झाली होती ,निम्मित होतं जि प प्रा शा गोपाळवाडी मध्ये आज आयोजित केलेला शाळास्तरीय बाल आनंद मेळावा ,खाद्य जत्रा आणि तिळगुळ वाटपाच्या कार्येक्रमाचे …..!!
ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आठवडी बाजार ,खरेदी विक्री यांचे ज्ञान व्हावे ,त्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी या हेतूने आणि मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते ……!!
विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक पद्धतीने आपल्या या स्टॉलची रचना केली होती ,शाळेच्या छोट्या मैदानात दोन बाजूने हे स्टॉल विद्यार्थ्यांना लावून दिले आणि मग सुरू झाली विद्यार्थी ,पालक आणि समस्त ग्राहकांची एकच झुंबड ….!!
कोमलचे चवदार सामोसे ,शुभमचे अप्पे आणि उडीद वडे ,ओंकारचा गाजर हलवा ,अजितची टीक्की ,चिमुकल्या साईची मेथीची भाजी ,गौरवची चिक्की अशा नानाविध पदार्थांची हे स्टॉल सजले ,ग्राहकांना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी आमचे हे चिमुकले सुद्धा मोठमोठ्याने आपल्या मालाची जाहिरात करत होते….!!
माता पालकांनी ,ग्रामस्थांनी ,चिमुकल्या लेकरांच्या आजींबाईंनी सुद्धा आवर्जून आपल्या नातवंडाचे कोडकौतुक करण्यासाठी या बाजारातून खरेदी केली ,विद्यार्थ्यांबरोबर भाव केले आणि त्यांचे व्यवहार ज्ञान तपासून पाहण्याचा प्रयत्न केला ….!!
शुभमने आपल्या अप्पे आणि उडीद वड्यांच्या विक्रीतून सर्वाधिक 210 रुपयांची कमाई केली ,तर अभ्यासात तसा थोडा मागे असणारा आणि इतर वेळी अबोल असणाऱ्या गौरवाने 20 रुपयांच्या चिक्कीचे 25 रुपये करून आपण व्यवहारात कच्चे नाही हे दाखवले …..!!
कमाल केली ती आमच्या इयत्ता पहिलीच्या महेश उर्फ छोट्या आणि पृथ्वीराज यांनी ,छोट्याने पहिल्या १० मिनिटात आपल्याकडचे सगळे पोंगे मोठं मोठ्याने ओरडून विकले सुद्धा आणि आलेल्या पैश्यातुन पुन्हा मनसोक्त खरेदी करून ,भेळ ,गाजर हलवा ,वडा यांच्यावर ताव पण मारला ….!!
चिमुकल्या साई ने आणलेली सगळी मेथी ची भाजी ,कैऱ्या आणि लिंब यांची भारीच विक्री करून दाखवली आणि उपस्थितांची शाबासकी मिळवली ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम तात्या जाधव यांनी या वेळी आवर्जून उपस्थित राहून जवळजवळ सर्व दुकानातून खरेदी करून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले ,तर मुख्याध्यापक श्री राऊत सर आणि मला सुद्धा विद्यार्थी उधर किंवा कमी किमतीत काही दयायला तयार होत नाहीयेत हे पाहून माजी सरपंच हिराबाई ज्ञानदेव जाधव यांनी ही लेकरांच्या व्यवहारी वृत्तीचे कौतुक केले …..!!
या वेळी मतापालकांसाठी आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने हळदी कुंकवाचा कार्येक्रम तसेच पालकांसाठी तिळगुळ वाटप ही करण्यात आले ,या प्रसंगी वाण म्हणून शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले , विद्यार्थ्यांसाठीही काही मानिरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले …!!
अतिशय आनंदात ,उत्साहात आणि धमाल मस्ती करत लेकरांनी सकाळी ११.३० ते १.१५ पर्यंत बाल आनंद मेळावा / खाद्य जत्रेचा आनंद लुटला ,शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना टिक्की ,तिळगुळ आणि कोरडे सामोसे यांचे वाटप करून बाल आनंद मेळाव्याचा सांगता करण्यात आला …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प शा गोपाळवाडी ,राहुरी
जि अहमदनगर
सदरील बालआनंद मेळाव्याची काही क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा ..