गोपाळवाडी स्पेस 4D केंद्र
Gopalwadi space center
‘जि.प. प्रा.शा. गोपाळवाडी स्पेस 4D केंद्र’ येथून झाले चांद्रयान २ चे प्रक्षेपण…!!
मागच्या महिन्यात नासाच्या मोहिमेअंतर्गत मंगळ ग्रहावर आपली नावे पाठवून झाल्यानंतर मागच्या आठवड्यात ग्रहमाला आमच्या शाळेत अवतरली होती ,या दरम्यानच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्याला ५० वर्ष पूर्ण होत होते आणि आपल्या भारतमातेच्या ‘चांद्रयान -२’ च्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून अवकाश संशोधनाला एक नवी उंची मिळणार होती.
सोमवार दिनांक २२ जुलै २०१९ चंद्रयान -२चे GSLV-MK३ या शक्तिशाली रॉकेटद्वारे प्रेक्षेपणाचा दिवस .तांत्रिक बिघडामुळे मागे रद्द केलेलं प्रक्षेपण आपल्या संशोधकांच्या अथक परिश्रमाने ,मेहनतीने आणि जिद्दीने २२ जुलैला यशस्वी झाले.आता प्रत्यक्ष आपले हे चांद्रयान चंद्रावर उतरल्यावर तिथे पोहचणारा भारत हा केवळ ४ था देश असणार आहे याचा लेकरांना कोण आनंद झाला .चांद्रयानचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहून आंनद ,आश्चर्य आणि अभिमान अशा संमिश्र भावना त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या.
त्याच दिवशी ATM औरंगाबादचे आमचे मित्र नितीन अंतरकर सर यांनी आपल्या शाळेत AR अँप च्या मदतीने रॉकेट प्रक्षेपण केल्याचा व्हिडीओ पहिला ,मुलांनाही दाखवला ,त्यांना तो जाम आवडला ,आणि मग काय ? आम्ही सुद्धा आमच्या शाळेतून चांद्रयान-२ प्रक्षेपण करण्याचा निश्चय केला.
प्रत्यक्ष चांद्रयानच्या प्रक्षेपणात जशा अडचणी आल्या तशाच अडचनीचा सामना आम्हाला सुद्धा करावा लागला ,२२ तारखेला त्या अँपची माहिती मिळाली आणि २३ ला प्रक्षेपण करण्याचा निश्चय केला ,पण २३ तारखेला सकाळी त्याची मार्कर इमेजच मिळाली नाही ,दुपारी मार्कर इमेज मिळाल्यावर ती प्रिंट करून घेण्याची अडचण आली ,२४ जुलैला काही वैयक्तीक कारणाने हे प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकलावे लागले आणि शेवटी आज २५ जुलैला पुर्ण तयारीने चांद्रयानचे प्रेक्षेपण दाखवण्याचे ठरवले.नितीन अंतरकर सर आणि सोलापूरचे आमचे तंत्रस्नेही मित्र ज्ञानेश्वर विजागत सर यांच्या कडून अधिक माहिती घेऊन Space 4D या AR अँपच्या साह्याने चांद्रयानचे प्रत्यक्ष प्रेक्षेपण हे आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,स्पेस 4 D केंद्र येथून करण्यात आले.
प्रत्यक्ष आपल्या शाळेतून या यानाचे प्रक्षेपण पाहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. “विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि अवकाश संशोधन क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांत गोडी निर्माण होऊन भविष्यात यातूनच वैज्ञानिक घडावेत” असा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत हे म्हणाले.
“AR हे तंत्रज्ञान अध्ययन -अध्यापनासाठी अत्यंत उपयुक्त असून त्याचा योग्य वापर केल्यास आनंददायी व मनोरंजक पद्धतीने शिक्षणाला मदत मिळते” असे शाळेतील उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
या नैवण्यापूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राहुरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे ,विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर ,केंद्रप्रमुख थोरात ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव आदींनी शाळेचे कौतुक केले आहे.
या नवीन अँपची माहिती, वापर व इमेज उपलब्ध करून दिल्याबद्दल आमचे मित्र नितीन अंतरकर आणि ज्ञानेश्वर विजागत यांचे विशेष आभार …..!!
असे करा तुमच्या शाळेतून अवकाश यानाचे प्रक्षेपण-
१) प्ले स्टोर वरून Space 4D+ हे अँप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
२) त्याच्या मार्कर इमेज घ्या
३) मोबाईलमध्ये अँप उघडून मार्कर इमेज स्कॅन करा.
४) यान प्रक्षेपणाची प्रक्रिया तुमच्या समोर पार पडतांना पाहायला मिळेल.
५) या अँपच्या मदतीने पृथ्वी ,आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र ,लुनर रोव्हर ,वोस्टोक कृत्रिम उपग्रह इत्यादी गोष्टी ही विद्यार्थ्यांना दाखवू शकतो
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर