International Mother Tongue Day & Global Reading Marathon
On the Eve of “International Mother Tongue Day ” and in collaboration with the ‘Global Kidlink Reading marathon’. Yesterday we arranged India – Russia reading marathon. We were pleased to read & listen to Marathi
We sang patriotic songs , poems of famous marathi poets and spoke about historical and cultural monuments of the respective countries…!!
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी साधला रशियातील मित्रांशी संवाद ….!!
21 फेब्रुवारी हा दिवस जगभरात अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे ,त्या निमित्ताने रशियातील अबान प्रांतातील लॅरीसा मॅडम यांच्या पुढाकारातून “किडलिंक ग्लोबल रिडींग क्लब”च्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थी आपल्या इतर देशातील मित्रांबरोबर ‘रिडींग मॅरेथॉन’ या उपक्रमांतर्गत आपल्या मातृभाषेतील गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवणार आहेत.
त्या अंतर्गत आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ता राहुरी च्या विद्यार्थ्यांनी रशियातील वोलगोग्राड शहरातील जिमनेशियम शाळा क्रमांक 9 मधल्या विद्यार्थ्यांबरोबर व्हर्चुअल संवाद साधत ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा केला. विद्यार्थ्यांनी या वेळी त्यांना ‘परीची ज्यादु’ , भाषेची गंमत या पुस्तकातील उतारे वाचुन दाखवले तर चौथीच्या पाठयपुस्तकातील ईदगाह हा मुंशी प्रेमचंद यांचा धडा सुद्धा वाचून दाखवला , रशियन विद्यार्थी मित्रांनी ‘अन इंनचांटेड कॅसल’ या रशियन भाषेतील पुस्तकातील उतारे वाचून दाखवले.
अंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्ताने घेतलेल्या या रिडींग मॅरेथॉन मध्ये पुढे विद्यार्थ्यांनी एकमेकांना आपापल्या मातृभाषेतील देशभक्तीपर गीत ,कविता यांचे गायन करून दाखवले. आमच्या विद्यार्थ्यांनी ‘या भारतात बंधू भाव नित्य वसू दे ….’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देशभक्तीपर गीत ,तर ‘एई देसो ,एई माटी ….’ हे ऊरिया भाषेतील एक गीत म्हणून दाखवले. त्याबरोबर ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही कुसुमाग्रजांची आणि ‘समतेचे हे तुफान उठले….’ ही विंदा ची ही कविता म्हणून दाखवल्या …..!!
दोन्ही कडच्या विद्यार्थ्यांनी उत्सुकतेतून एकमेकांना अनेक प्रश्न विचारले , आपल्याकडे 3 भाषा शाळेत शिकवल्या जातात आणि मुलांना त्या बर्यापैकी बोलता येतात हे ऐकून रशियन विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले ,आमच्या वर्गात त्यांच्या देशाचा राष्ट्रध्वज पाहून ते अचंबित झाले.
या संवादासाठी राशियातून तातीएना आणि ओलगा मॅडम यांनी तर आमच्या शाळेतून मुख्याध्यापक सर्जेराव राऊत आणि नारायण मंगलारम यांनी संवादकाची भूमिका पार पडली.
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर