आंतरराष्ट्रीय योग दिवस
“आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ ,
आम्ही एका विचाराने राहू ,
एकच विचार बोलू ,
आमचे मन एक असो ,
पूर्वी देवांनी एकत्र येऊन मोठे यश मिळवले,
तसे आम्हीही आमच्या प्रयत्नाने मिळवू.’
या अर्थाच्या प्रार्थनेने आजच्या मंगल दिनाची सुरवात झाली ,निमित्त होते २१ जून – आंतरराष्ट्रीय योगदिन….
- आरोग्याचे महत्व –
आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये शरीराला ,आरोग्याला खूप महत्व दिले आहे ,’आरोग्यम धन संपदा’ म्हणजेच आरोग्य हेच धन संपदा आहे अशा अर्थाची उक्ती आपल्या शास्त्रात सांगितली आहे. शरीर संपदा ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. यासाठी योग साधना करून आपण ती मिळवू शकतो.नियमित योग करून आपण ती मिळवू शकतो .
- आंतरराष्ट्रीय योग दिन –
आज शुक्रवार दिनांक २१ जून २०१९ ला सकाळी ठीक ७.१० वाजता आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,केंद्र उंबरे ,ता राहुरी ,जि अहमदनगर शाळेत आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून ‘योग दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
- पूरक हालचाली –
सुरवात शरीराला थोडी उष्णता मिळण्यासाठी हातापायांच्या ,मानेच्या पूरक हालचालींनी करण्यात आली.
- आसने –
पूरक हालचाली नंतर लहान इयत्तांच्या अनुषंगाने उभे राहून करावयाची ताडासन ,वृक्षासन ,त्रिकोनासन,हस्तपादासन नंतर बसून करावयाचे पद्मासन, वज्रासन ही आसने नंतर पोटावर ,पाठीवर झोपून करावयाची आसने घेण्यात आली.
- सूर्यनमस्कार आणि प्राणायाम –
सर्वांसुंदर व्यायाम प्रकार असणाऱ्या सूर्यनमस्कारांची माहिती देतांनाच सूर्याला वंदन करत सूर्यनमस्कार घालण्यात आले आणि नंतर कपालभाती ,अनुलोम विलोम ,भस्त्रीका हे प्राणायाम करून तदनंतर ओंकार ध्यानधारणा आणि शवासन इ. विविध योग – प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक शिक्षक श्री.मंगलारम सर यांनी केले.शाळेतील सर्व विद्यार्थांनी ,काही पालकांनी आणि सदस्यांनीही मोठ्या उत्साहात आणि आनंदात यामध्ये सहभाग घेतला.
- योगा आणि व्यायामाचे महत्व –
आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये शरीराला आरोग्याला खूप महत्व दिले आहे , ‘आरोग्यम धन संपदा’ अशी आरोग्य हेच धन संपदा आहे अशा अर्थाची उक्ती आपल्या शास्त्रात सांगितली आहे. शरीर संपदा ही सर्वश्रेष्ट संपत्तीआहे .यासाठी योग साधना करून आपण ती मिळवू शकतो. मानवी जीवनात योगाला खूप महत्व आहे. अशा या योगाचे ,व्यायामाचे महत्व शाळेतील शिक्षक मंगलारम सर यांनी सर्वांना समजावून सांगितले.आज २१ जुन हा आपल्या सौर वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. योगसाधनेमुळे हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होऊ शकतो. असे ही सर या वेळी म्हणाले.
- उपस्थिती –
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य श्री सीताराम जाधव , मा सरपंच ज्ञानदेव अण्णा जाधव ,श्री सुदाम जाधव ,श्री दादासाहेब जाधव आदी सदस्य ,अंगणवाडी कार्यकर्त्या जाधव मॅडम ,कुर्हे मॅडम व पालक ही उपस्थित होते.
मंगलारम सर यांनी आयुष्य सुंदर जगण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही हे सांगून आपण दैनंदिन जिवनात योग करून जीवन आनंदी करण्याचे आवाहन ही केले…!!
- प्रार्थना –
ऊँ सर्वे भवन्तुसुखिन ,
सर्वे सन्तु निरामया ,
सर्वे भद्राणी पश्वन्तु ,
या कश्चिदु :ख भाग्यवेततु
- संकल्प –
“मी स्वतःशी निश्चय करतो की मी नेहमी मनाच्या संतुलित अवस्थेत राहीन अशा संतुलित मनानेच सर्वोच्च स्वयंविकास शक्य आहे.जगात शांती ,आरोग्य आणि सुसंवाद नांदावा म्हणून स्वतः कुटुंब ,कार्यालय आणि समाजाप्रती कर्तव्य निभावण्यास मी कटिबद्ध आहे.”
या संकल्पासह ‘शांतता आणि सुसंवादासाठी योग’ म्हणत योग दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.
जि प प्रा शा गोपाळवाडी
के. उंबरे ,ता. राहुरी जि.अहमदनगर
10 Comments
उमेश अर्जुनराव नेवसे
दादा, लै भारी योग दिन साजरा केला. आणि प्रवेश उत्सव सुद्धा. आणि संतोष दादा चा लेख अप्रतिम आहे.
माझं नशीब की atm मध्ये आलो आणि तुमच्यासारखी माणसं मिळाली.
Narayan Mangalaram
धन्यवाद
Arun Rathod
नारायण सर योगदिनाचे आयोजन आणि नियोजन नेहमीप्रमाणे जबरदस्त भारदस्त तुमच्यासारखेच
फलकलेखन पण खुप छान
Narayan Mangalaram
धन्यवाद
Santosh waghmode
Nice sir
Pooja Ellaram Bhus
मस्त..👌
Narayan Mangalaram
धन्यवाद
Narayan Mangalaram
Thanks a lot
Pooja Ellaram Bhus
मस्त..👌
Narayan Mangalaram
धन्यवाद