गोपाळवाडी शाळेची गगनभरारी…
गोपाळवाडी शाळेची गगनभरारी… अर्थात गोपाळवाडी शाळा ठरली मायक्रोसॉफ्टच्या व्हॉईस पॉड गिफ्टची विजेता
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथील शिक्षक सर्जेराव राऊत सर व नारायण मंगलारम हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीच्या फ्लिपग्रीड या शिक्षणोपयोगी टूलच्या मदतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबवित आहोत.
१ली ते ४थी वयोगटानुसार १ ते २० पर्यंत पाढे, कविता ,आवडती कविता ,आवडता खेळ यांचे स्वतंत्र क्यु आर कोड तयार करून या बुक मध्ये चिकटविले आहेत. आमचे विद्यार्थी हे कोड स्कॅन करून अभ्यास करतात, सराव करतात.
त्याच प्रमाणे विद्यार्थी जगभरातील इतर शिक्षकांनी तयार केलेल्या विविध विषयांवरील ग्रीडवर आपला प्रतिसाद शिक्षकांच्या मदतीने नोंदवत आहेत ,या टूलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपला आवाज जगपर्यंत पोहचवण्याची एक नामी संधी मिळाली आहे ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याची व जगभरातील आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांपर्यंत आपले मत पोहचवण्याची संधी मिळाली आहे.
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आता पर्यन्त रशिया ,पोर्तुगाल ,भारत ,अर्जान्टीना आदी देशातील शिक्षकांच्या ग्रीडवर आपला प्रतिसाद नोंदवला आहे ,३० सेकंदापासून ते २ मिनीटापर्यंतच्या या नोंदवण्यात येणाऱ्या प्रतिसादाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्वतःला अभिव्यक्त होता येते आहे.
मायक्रोसॉफ्टच्या वतीने अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या टूलच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरील सर्व शाळांची विद्यार्थ्याना आपला आवाज जगपर्यंत पोहचवण्याची संधी देणारी #FlipgridTeam.. खुप उल्लेखनीय काम करीत आहे.. आम्ही देखील या #FlipgridVoicePod मार्फत ज्या जागतीक समस्या आहेत, त्यावर आधारित संदेश देऊ इच्छितो.. ,आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाचा आवाज जगाला ऐकवू इच्छितो ….
आमच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल फ्लिपग्रीड ने घेतली. आपण मायक्रोसॉफ्टच्या या अशा विविध टूल्सचा वापर शाळेसाठी कशा रितीने करता याचे मुल्यमापन या टीम कडून केले जाते आणि त्यातूनच आमच्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून मायक्रोसॉफ्टच्या फ्लिपग्रीडने आमच्या मुलांसाठी #FlipgridVoicePod गिफ्ट म्हणून पाठवून दिला.
फ्लिपग्रीडचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन या शहरात असुन , हजारो मैलांचा प्रवास करून हे गिफ्ट आज महाराष्ट्रतील या एका छोट्याशा वाडीवरच्या शाळेपर्यंत पोहोचले आहे. आपल्या महाराष्ट्रात यापूर्वी पुणे जिल्ह्यातील पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिंदेवस्ती अशा दोन शाळा नंतर अशा प्रकारचे गिफ्ट जिंकणारी गोपाळवाडी ही राज्यातील मात्र तिसरी शाळा ठरली आहे.
“हे गिफ्ट आमच्यासाठी अनमोल आहे ,आमच्या विद्यार्थ्यांचा नवीन शिकण्याचा उत्साह वाढवणारे आहे .”असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत हे या वेळी म्हणाले.
“मायक्रोसॉफ्टचे संस्थापक डॉ चार्ली मिलर आणि नाटे एडवर्डस हे पुढच्या आठवड्यात १७ तारखेला हैद्राबाद येथे फिल्पग्रीड संदर्भातील भारतीयांचा प्रतिसाद ,सूचना आणि भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत असून ,त्या फ्लिपग्रीडच्या कार्यक्रमाचे आमंत्रणही गोपाळवाडी शाळेला मिळाले आहे.” असे नारायण मंगलारम यांनी सांगितले.
आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव यांच्या हस्ते हे गिफ्ट शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत सर ,नारायण मंगलारम व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले…
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर