एक हात मदतीचा
सुट्टीचा दिवस कोल्हापूरमधील पूरग्रस्तांमध्ये ..
सामाजिकतेच्या जाणिवेतून आम्ही अॅक्टिव टीचर महाराष्ट्र (ATM ) परिवारच्या वतीने कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीगोंडवाडी व गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे समस्त ATM परिवारने जमा केलेल्या मदतनिधी मधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दप्तर , कंपास ,वॉटर बॅग ,प्रत्येक विद्यार्थ्यास वह्या ,जेवणाचा डबा , पट्टी ,पेन ,पेन्सिल ,,,,,
असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचे हावभाव खूप आनंददायी होते…
आम्ही या सर्व विद्यार्थ्यांशी खूप आनंदाने चर्चा केली.
कारण या गावातील लोकांची घरे अनेक दिवस पुराच्या पाण्यात होती त्यामुळे त्यांच्या सर्व वस्तू खराब झाल्या होत्या.त्यामध्ये मुलांचे शालेय साहित्यही खराब झाले होते.
सुट्टीचा दिवस असूनही माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक आदरणीय तुकाराम अडसूळ
नारायण मंगलारम ,संजय जगताप ,श्रीनिवास एल्लाराम ,लक्ष्मीकांत इडलवार,भरत चव्हाण, गजानन उदार,श्रीकांत माणगावकर,राहुल भोसले,तुषार चोपडे यांनी ATM च्या वतीने हे साहित्य वाटप केले.यावेळी करवीर तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य ,करवीर पंचायत समितीचेउपसभापती ,
सरपंच ,उपसरपंच , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य ,ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
यावेळी या गावातील सर्वांनी शिक्षकांच्या या सामाजिक कार्याबद्दल विशेष आभार मानले.
यासाठी ATM परिवारातील ज्यांनी मदत निधी दिला त्या सर्वांचे ATM परिवारातर्फे मनस्वी धन्यवाद