स्थानिक उद्योगाला क्षेत्रभेट
स्थानिक उद्योगाला क्षेत्रभेट
आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2017 रोजी आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी आणि जि प प्रा शा चेडगांव या दोन्ही शाळांनी प्रसाद साखर कारखाना ,वांबोरी येथे संयुक्तरित्या स्थानिक उद्योगाला क्षेत्र भेटी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता ….!!
या वेळी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत ,उसापासून साखर कशी तयार करतात याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली …..!!
कारखान्याची पाहणी झाल्यावर कारखान्याच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाची पोटभर साखर खाऊ घालण्यात आली नंतर परिसरतीलच साखरशाळेत विद्यार्थ्यांनी डब्याचा आस्वाद घेतला ,चेडगांव शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले ….!!
मनसोक्त साखर ,खाऊ आणि साखर कारखाना भेट यामुळे तृप्तीची ढेकर देत विद्यार्थी आता पुन्हा शाळेकडे परत निघाले आहेत ….!!