जगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे
जगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे ,गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला युक्रेनच्या विद्यार्थ्यांन बरोबर ….!!*
आज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर हा दिवस जगभरातील शांतताप्रिय देश *”आंतरराष्ट्रीय शांतता दिन ( International Peace Day )”* म्हणून साजरा करतात . जागतिक शांततेसाठीचा प्रयत्न म्हणून हा दिवस सन 1981 पासून युनोच्या वतीने साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन’ साजरा करण्यात आला.
*अणु हल्ल्यामुळे जपानचा विध्वंस झाला,*
*त्यावेळी जपान आकाशवाणीवर सतत एक महिना दुखवटा म्हणून फक्त एकच धून वाजविली जात होती .ती म्हणजे ,*
*“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा।*
*सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं’’ ।।*
*याचा परिणाम असा झाला की, जपान हे बौध्दराष्ट्र असल्यामुळे आपल्या झालेल्या विध्वंसाचा अमेरिकेचा बदला घेऊ शकला नाही. त्यांना बुध्दांच्या शिकवणीची आठवण झाली ,तथागतांनी शाक्य आणि कोलिय यांचे युध्द होऊ दिले नव्हते, त्यासाठी त्यांनी राजवैभव त्यागले आणि सांगितले , “युध्दाने कोणतेही प्रश्न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्त्या करतो, त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो.जो दुसर्याला जिंकतो,त्याला जिंकणारा दुसरा भेटतो.जो दुसर्याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्न दोन्हीही बाजूचे प्रतिनिधी निवडून सामोपचाराने मिटवावे”.बदला घेण्याचा विचार जर जपानने केला असता तर जगाचा विनाश अटळ होता.*
*राष्ट्रपिता महात्मा गांधीनीही म्हंटलेच आहे ,*
*” An eye for an eye ,makes the whole world blind…..!!”*
भारत ही प्राचीन काळापासून शांतताप्रिय लोकांची भूमी आहे ,जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची भूमी आहे ,अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधींची भूमी आहे….!!
हे सर्व आठवून म्हणावसं वाटतं,
*जगाला ”युध्द नको बुध्द हवा” आहे*
शाळेतील शिक्षक नारायण मंगलारम यांनी ही माहिती विद्यार्थ्यांना देऊन शांततेचा संदेश जगाला देण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
युक्रेन च्या कमिआईंक टाऊन कैन्सिल च्या लयकमे नं 1या चेरकसी प्रांतातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर स्कायपेवरून संपर्क करून ,”हिंद देश के निवासी ” हे गीत सादर केले ,शांततेचा संदेश देणाऱ्या पीस डोव्हचे आदान प्रदान करून आम्ही आजचा आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला…..!!
विद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब …..!!’ हे गीत सादर केले ,
यावेळी ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुर्हे व विद्यार्थी उपस्थित होते.
*शब्दांकन*
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर