स्काईप लेसनच्या मदतीने गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले कार्यानुभवचे धडे
स्काईप लेसनच्या मदतीने गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले कार्यानुभवचे धडे….
आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी याठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन कम्युनिटीच्या’ अंतर्गत आणि सोलापूर येथील ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट सुप्रिया शिवगुंडे’ यांच्या मार्गदर्शनाखाली स्काईप लेसनच्या मदतीने कार्यानुभवचे धडे गिरवले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या गुणवत्ते बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठे ही मागे न राहता आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचाही तितक्याच प्रभावी वापर करत आहेत ,म्हणूनच गोपाळवाडी शाळेतील सर्टिफाइड मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर नारायण मंगलारम यांनी शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत ICT वापराच्या ह्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर कम्युनिटी अंतर्गत स्काईप लेसन , व्हर्च्युअल फील्ड ट्रीप , मिस्ट्री स्काईप , स्काईप कॉल्याबरेशन या विविध अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश विदेशातील तज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांचे मार्गदर्शन व्हर्चुअली मिळवण्याची ,जगभरातील ठिकाणे व्हर्चुअली पाहण्याची ,त्याविषयी अधिक जाणून घेण्याची, जगभरातील विद्यार्थ्यांसमवेत ,संवाद साधण्याची , प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळते.
त्याअंतर्गत आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2019 रोजी 12.30 ते 1.30 या वेळेच्या दरम्यान मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर कम्युनिटीच्या स्काईप लेसनचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आपल्या महाराष्ट्रातुन गेल्या सलग तीन वर्षापासून ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्सपर्ट’ या मानाच्या मानकरी ठरत आलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांनी ‘बिकम अ क्रिएटिव्ह’ या आपल्या स्काईप लेसनच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना ‘पेपर हॅन्ड पपेट’ बनण्याचे प्रात्येकशिक करून दाखवून ,प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन करत बनवूनही घेतले ,त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना एक छान अशी गोष्ट ही सांगितली .
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव हा विषय अतिशय आवडीचा आणि त्यात या नाविन्यपूर्ण पद्धतीच्या अनुभवाने विद्यार्थी भारावून गेले.
पेपर हॅन्ड पपेट तयार झाल्यावर त्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील ‘पाणी किती खोल ?’ या पाठाचे सादरीकरण या पेपर पपेटच्या साहाय्याने शिवगुंडे मॅडम यांना करून दाखवले .
अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुऱ्हे ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव आणि मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी हा उपक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर
5 Comments
Supriya Shivgunde
Very Nice….. Wishing All the Best for next journey….
Narayan Mangalaram
Thanks a lot
राधिका सचिन पवार
खूप छान आणि आनंद दाई उपक्रम
Narayan Mangalaram
धन्यवाद
Umesh vijaykumar veer
Very nice enthusiastic program fro school child.specialy thanks to Narayan sir