जागतिक महिला दिन
जागर नारीशक्तीचा
अर्थात
जागतिक महिला दिन
शुक्रवार दि.०८ मार्च २०१९
सोड साऱ्या रूढी अनिष्ट ,
उधळ ती जातीयता ,
प्रगतीची धर कास ,
घे तू खड्ग हाती आता…
आष्टावधानी रूप धारण करून घर ,शेती ,समाज ,कार्यालय अशी सर्व ठिकाणी तितक्याच सक्षमपणे आजी ,आई ,बहीण ,पत्नी , अधिकारी या विविध भूमिका प्रभावीपणे पार पाडत चौफेर किल्ला लढवणार्या तमाम नारी शक्तीला वंदन करण्याचा दिवस …..!!
‘चूल आणि मूल’ यातून बाहेर पडून ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ पर्यंतचा प्रवास करून आज जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार्या नारी शक्तीचा सन्मानाचा दिवस…..!!
आज आपण पाहतोय गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत सर्व पदांचा कार्यभार अतिशय चोख बजावणाऱ्या अशा या माता-भगिनी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस …..!!
“अर्थात जागतिक महिला दिवस”
आज आमच्या जि.प.प्रा.शा गोपाळवाडी ,केंद्र उंबरे येथे जागतिक महिला दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहाने संपन्न झाला…!!
या कार्यक्रम साठी खास उपस्थित असलेल्या मातापालक संघाच्या अध्यक्षा सौ रुक्मिणीबाई जाधव ,गावच्या रहिवाशी आणि अंगणवाडी सेविका सौ हिराबाई जाधव ,मदतनीस सौ छायाबाई कुऱ्हे ,कर्तृत्ववान नवतरुणी ,अंजली आणि कमल तसेच शा व्य समिती अध्यक्ष श्री सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत कार्येक्रम।संपन्न झाला…!!
इतर वेळी आपल्या घरकामाच्या व्यापात व्यस्त असणाऱ्या महिला भगिनीना व्यासपीठावर विराजमान केल्यावर त्या भारावून गेल्या ,त्या सुद्धा सन्मानाच्या हक्कदार आहेत हेच या सन्मानातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला ….!!
कार्यक्रमाची सुरुवात आद्यशिक्षिका क्रांतीज्योत सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेतील जयश्री जाधव हिच्या मनोगताने झाली….!!
शाळेत या कार्यक्रमसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्रत्येक माता पालक ,कर्तृत्ववान नवतरुणी यांचा या वेळी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला …..!!
शाळेच्या अतिशय गुणी आणि हुशार विद्यार्थिनीं ज्यांनी आज कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा सुद्धा केली होती अशा जयश्री जाधव ,कोमल जाधव आणि प्रियांका हापसे यांनी आपापल्या वेशभूषे नुसार थोडक्यात सादरीकरण केले , या तिघींचा फुले देऊन कार्येक्रमाच्या अध्यक्षा रुक्मिणीबाई जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला….!!
सूत्रसंचालनाच्या माध्यमातून ‘महिला बरोबर महिला दिन का साजरा करावा ,महिला दिनाचा इतिहास ,भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून महिलांचा केला जाणार सन्मान ,मातृसत्ताक पद्धती आदी बाबींची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला…..
‘आसवे लपवून पान्हा पाजणारी भक्ती तू ,
काढूनी समशेर झांशी मागणारी शक्ती तू ..’
या उक्तीप्रमाणे कार्य करणाऱ्या कार्तृत्ववान महिलांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत सर यांनी , हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या माता राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांनीच घडवले , तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिला शिक्षणाची भारतात रोवलेल्या मुहूर्तमेढि मध्ये आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची त्यांना मिळालेली खंबीर साथ तितकीच मोलाची होती ,इतकेच नाही तर आता भारताच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी अतिशय समर्थपणे संभाळणाऱ्या संरक्षण मंत्री या निर्मला सीतारामन यांच्या सारख्या एक कर्तबगार महिलाच असून, महिला या आज प्रत्येक क्षेत्रात पूढे आहेत ,नेतृत्व करत आहेत ,कर्तृत्व गाजवत आहेत ,आपण त्यांना योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे हे सांगितले…..!!
शेवटी आमच्या गोपाळवाडी शाळेची गाणं कोकिळा कु स्वरांजली जाधव हिच्या ‘सांग ना आई मला ,कोण वाचवणार ….?’ या गीताने या थोडक्यात पण मस्त कार्यक्रमाची सांगता झाली …
‘बाई एक अखंड संघर्ष व योध्दा
चला जपूया बाईतल बाईपण ,
आईपण आणि अंखड माणूसपण
कारण तेच आपल मूळ आणि कुळ
बाई सृजनाच विवेकीपण
सलाम बाईला ,महिलांना ,नारीला या सर्वाना’🙏
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि.प.प्रा.शा. गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर